ढाणकी प्रतिनिधी
कोरोणा विषाणू आणि त्याच्या वेगवेगळ्या व्हेरियंट ला आळा घालण्यासाठी संपूर्ण लसीकरण हे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी प्रशासन देखील सज्ज असून वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी जनजागृती करत आहे. नागरिक देखील आता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत असून लवकरच संपूर्ण लसीकरण होईल यात शंका नाही. या लसीकरण मोहिमेमध्ये आता यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांनीसुद्धा उडी घेतली असून ते स्वतः एका ऑडिओ क्लिप द्वारे ते जनतेला लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगत आहेत. सध्या ती ऑडिओ क्लिप प्रत्येकाच्या फोनमध्ये असून स्वतः जिल्हाधिकारी साहेब संवाद साधत असल्याने नागरिकांचे सुद्धा मनोबल वाढत आहे व नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. कोरोनाविषाणू पासून सुरक्षित राहण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे महत्त्वाचे आहे ज्या व्यक्तींचा फक्त एकच डोस झाला आहे त्यांनी लवकरच लसीचा दुसरा ही डोस घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी साहेब यांनी त्या क्लिप मध्ये केलेले आहे. यवतमाळ जिल्हा प्रशासन हे लसीकरण मोहीम अतिशय उत्कृष्टपणे राबवत असून दारोदार जाऊन नागरिकांचे लसीकरण केल्या जात आहे. अनेक ठिकाणी तर यासाठी लसीकरण वॅन तयार केलेल्या असून घरपोच जाऊन नागरिकांना लस दिल्या जात आहे.
जिल्हाधिकारी साहेब यांनी जिल्ह्यामध्ये लवकरच संपूर्ण लसीकरण करण्यासाठी कंबर कसली असून त्यांच्या या कार्यप्रणाली मुळे नागरिकांमध्ये त्यांचे कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या