प्रतिनिधी ढाणकी
उमरखेड तालुका अंतर्गत येणाऱ्या अकोली या गावांमध्ये कोरोणाचा प्रदुर्भाव टाळून शाळा व्यवस्थापन समितीची सर्व गावकऱ्यांच्या वतीने एकमताने निवड करण्यात आली या वेळी उमरखेड पंचायत समितीचे माजी सभापती प्रविण पाटील मिराशे यांच्या नेतृत्वात आकोली गावचे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष नवल विजय पवार पाटील यांच्या नेतृत्वात व संदीप धात्रक यांच्या मार्गदर्शनात अकोली जिल्हा परिषद शाळेची कार्यकारणी ही अतिशय कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू न बाळगता अकोली या गावामध्ये शालेय व्यवस्थापन समितीची निवड ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली असून यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रफुल पाटील पवार व उपाध्यक्ष शंकर राठोड व कार्यकारिणीचे सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली आकोली गावचे सन्माननीय सरपंच साधना ताई जामकर केंद्रप्रमुख भिंबरवाढ सर सोसायटी अध्यक्ष नवल विजय पवार पाटील,साहेबराव पाटील मिराशे,माजी अध्यक्ष दिगांबर देवसरकर यांच्या नेतृत्वात ही निवड करण्यात आली यावेळी अकोली गावातील पालक वर्ग माझी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य हे उपस्थित होते या व्यवस्थापन समिती साठी शाळेचे शिक्षक सावते सर मिराशे सर सरवदे सर हाळे सर यांनी परिश्रम घेतले व प्रस्ताविक अकोली चे मुख्याध्यापक श्री आनंद पोपुलवाड यांनी केले.
0 टिप्पण्या