यशस्वी जीवनाचा मूलमंत्र ” शिक्षण : - प्राचार्य डॉ.वि.ना.कदम जातीय सलोखा कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


कमलाकर दुलेवाड,  बिटरगाव बु 

सर्वांत मौल्यवान गोष्ट ही आई वडील आहे.त्यांनी तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं त्यांनी

 घेतलेल्या निर्णयामुळे मुलांचे भवितव्य भविष्य उज्ज्वल घडते शिक्षणांची उंच शिखरे गाठता येऊ शकते. मनात चिकाटी,ध्येय असेल तर विद्यार्थीसाठी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. तो जितका शिक्षणामध्ये ,मैदानी खेळात ज्ञान विकसीत करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो. शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते.माणसाची व स्वतः ची ओळख निर्माण ही शिक्षणातून होते.असे प्रतिपादन विद्यार्थ्यांना जातीय सलोखा या कार्यक्रमात केले. 

बिटरगांव बु येथील नवदुर्गा मंडळ ग्रामस्थांनी व युवकांनी पोलीस स्टेशन बिटरगांव बु.यांच्या संयुक्त विद्यमाने बिटरगांव बु येथे जातीय सलोखा नांदण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगांव बु येथे गावातील युवकांना व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वांचा पाया स्पर्धा परीक्षातुनच रचला जातो, शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार, मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून आहे.या उदात्त हेतूने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उमरखेड येथे प्राचार्य डॉ.वि.ना.कदम त्याचा विषय आपले जिवन आपले ध्येय, डॉ.अविनाश खंदारे युवा पिढी आणि लागलेले व्यसन, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, संतोष तिरमकदार उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, डॉ.प्रेम हनवते व्यक्तीमहत्त्व विकास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गावातील स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे युवकांना व  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.वि.ना.कदम डॉ.प्रेम हनवते, डॉ.अविनाश खंदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस, संतोष तिरमकदार या सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संपूर्ण विद्यार्थ्यांचा  व्यक्तिमत्त्वाचा विकास हे  विद्यार्थ्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व, त्याच्या क्षमता, त्याची बुद्धिमत्ता, छंद, सवयी, वृत्ती दृष्टिकोन, जीवनविषयक मूल्ये  शारीरिक कृती या विद्यार्थ्यांच्या अंगी असणे आवश्यक आहेमानवी जीवनाच्या अनेक गरजांपैकी शिक्षण ही एक अत्यावश्यक गरज आहे. शिक्षण माणसाला अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बिटरगांव बु.येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष काशीनाथ पेंधे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.वि.ना.कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस, डॉ.अविनाश खंदारे लोकमत पत्रकार, डॉ.प्रेम हनवते, संतोष तिरमकदार, उपसरपंच प्रकाश पेंधे, प्राचार्या कुसुम मुनेश्वर, पोलीस पाटील नामदेव देवकते,कोंडबाराव इंगोले, श्रावण गायकवाड,तुकेश कांबळे, शिवाजी शिरगीरे,शेक शेफी शिक्षक, उपप्राचार्य एस.टी.बेद्रे, सचिन साखरे, संदेश कांबळे,विजय विनकरे,बंडु देवकते, प्रकाश खुपसरे,हे होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य एस.टी.बेद्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल माने यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपसरपंच प्रकाश पेंधे यांनी मानले.या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक व प्राध्यापक, गावातील नागरिकांनी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी शिवाजी पवार, अंकुश राजपल्लु,धम्मपाल इंगोले, पंडित राठोड, नामदेव करे, गणेश रणखांब, भिमराव बल्लाळ, विनोद बोबडे, गजानन रामशेटवाड, नवदुर्गा मंडळ ग्रामस्थांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या