महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव
क्रांती घडवावी तर बाबासाहेबांसारखी आणि शांती मिळावी तर गौतम बुद्धांसारखी संपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी जीवन वाहून घेणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी लक्षावधी अनुयांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, आज आपण सर्व स्वाभिमानाने जीवन जगतो याचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर असून आजचा दिवस हा त्यांच्या कार्याला उजाळा देणारा आहे, ज्ञानाचा अथांग सागर असलेल्या या महामानवाचा बौद्ध धर्म स्वीकारल्या नंतर अवघ्या दीड महिन्यातच 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले, दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले होते,हे दोन्ही दिवस अत्यंत महत्त्वाचे असून बहुजन समाजातील सर्वांना बाबासाहेबांच्या कार्याची आठवण जागृत झाल्या शिवाय राहत नाही, आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 65 व्या वर्धापन दिनाचा सोहळाचे आयोजन टाकळी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या इसापूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला इसापूर येथील पोलीस पाटील संध्याताई मारकवार, टाकळी येथील सरपंच उज्ज्वला हाके, उपसरपंच दिलीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य संदेश मोरे, विठ्ठल गव्हाळे ,उमेश जाधव, बाळू चव्हाण, अतुल देवकते किशोर पांडे तंटामुक्ती अध्यक्ष ,राजू मारकवार, सामाजिक कार्यकर्ते, कैलास मोरे,आशीष पाडें,सलमान पटान फुलसावगी रेणुका ऑप्टिकल्स चे संचालक आनंता मारकवार, अर्जुन राठोड, योगेश मारकवार कोतवाल ,दिलीप फुफरे ,नंदू मारकवार ,,सोनू रतनवार, देवबा आढाव ,गोवीदं मारकवार ,गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
0 टिप्पण्या