अमोल सांगानी राळेगाव
दि. 02/10/2021 रोजी फिर्यादी नामे FIS सोल्युशन अँड सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमीटेड प्रतिनिधी श्रीकांत पुरुषोत्तम इखे वय 41 वर्ष रा.अमरावती यांनी तक्रार दिली की, राळेगाव येथील मुख्य रोडलगत असलेले बँक ऑफ इंडियाचे ए.टी.एम.कोणीतरी अज्ञात इसमांनी ए.टी.एम.मधील सि.सि.टी.व्ही. कॅमेरावर काळा रंगाचा स्प्रे मारुन गॅस कटरच्या सहाय्याने ए.टी.एम.मशीन कापुन ए.टी.एम.मधील 8,लाख 69 हजार - रु नगदी चोरुन नेले अशा फिर्यादी वरुन पोलीस स्टेशन राळेगाव येथे अपराध क्रमांक 150/2021 कलम 379 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर घटनेची गांभीयाने दखल घेत मा.पोलीस अधीक्षक सा.यांनी सदर प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी व पथकाला दिले होते.
सदर गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्याच दरम्यान कळंब येथुन ऑक्सीजन सिलेंडर चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाल्याने दोन्ही गुन्हे हे एकाच टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्याने स्थानिक गन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती संकलित करुन विविध तपास कौशल्याचा वापर करुन गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाची इत्यंभुत माहिती तसेच इतर तांत्रिक माहिती संकलित करुन चोरी करणारी टोळी हि हरियाणा राज्यातील असल्याचे निष्पन्न केले.
त्यावरुन मा.पोलीस अधिक्षक श्री.दिलीप पाटील भुजबळ यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा,यवतमाळ व पोलीस स्टेशन राळेगाव येथील अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष तपास पथक आरोपी अटक करणेकरिता रवाना केले. सदर पथकाने उत्तर प्रदेश,हरियाणा,राजस्थान या तीन राज्यात आरोपीतांचा कसोशीने शोध घेउन हरियाणा राज्यातील गुन्ह्याचा मास्टर माइंड असलेला मुख्य आरोपी लियाकत अली दिन मोहम्मद वय 40 वर्ष रा.पिनांगवा तहसील पुन्हाना जि.नुह राज्य हरियाणा यास स्थानिक पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेउन त्यास विचारपुस केली असता आरोपीने त्याच्या इतर पाच साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.सदर आरोपीचे ताब्यातुन गुन्ह्यातील चोरी केलेल्या रकमेपैकी 1) 1,50,000/- रुपये 2) मारुती कंपनीची अर्टिगा वाहन क्रमांक HR 51 BY 4096 किंमत अंदाजे 10,00,000/- रुपये 3) मोबाईल फोन किं.अं. 10,000/-रुपये 4) काळ्या रंगाचा स्प्रे 5) बनावट नंबर प्लेट, ईत्यादी असा एकुण 11,60,500/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात पथकाला यश आले आहे. सदर गॅस कटर गँग चे सदस्य हे गुन्हे करण्यात सराईत असुन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गुन्हे करतात व गुन्हे करतेवेळी कोणताही पुरावा मागे सोडत नाहीत व कोणताही मोबाईलचा वापर करीत नाहीत तरी सुद्धा पथकाने अथक परिश्रम करुन आरोपी व गुन्ह्याचा मास्टर माइंड व टोळीतील पाच सदस्य यांना निष्पन्न केले आहे.
गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयापुढे हजर करण्याची कार्यवाही सुरु असुन सदर टोळीकडुन पोलीस स्टेशन कळंब येथुन अपराध क्र. 521/21 कलम 379 भादवि चा गुन्हा उघडकीस करण्यात आला असुन तपासादरम्यान आरोपीताकडुन महाराष्ट्रातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही डॉ.दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधिक्षक यवतमाळ, डॉ.खंडेराव धरणे ,अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ यांच्या आदेशाने प्रदिप परदेशी, पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.यवतमाळ, संजय चोबे पोलीस निरीक्षक पो.स्टे.राळेगाव यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोउपनि मोहन पाटील, पोहवा गोपाल वास्टर, नापोकॉ नितीन गेडाम, पोशि सचिन नेवारे पो.स्टे.राळेगाव, तसेच स्था.गु.शा.यवतमाळ चे सपोनि अमोल पुरी, पोउपनि भगवान पायघन, पोउनि योगेश रंधे, नापोशि बबलु चव्हाण,पोशि सलमान शेख, पोशि सुधीर पिदुरकर यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.
0 टिप्पण्या