दाऊ गाडगेवाड- हिमायतनगर प्रतिनिधी
हिमायतनगर शहरातील वार्ड क्रं. ०४ नेहरूनगर येथे सर्वसामान्य नागरीकांना एकमेव जलसाठा असलेली सार्वजनिक विहीर आहे. हि विहीर महामार्गावरील रस्त्यालगत असल्याने कंत्राटदाराने बुजवण्याचा प्रयत्न केला होता ती विहीर खुली करण्यासाठी उपोषणाला बसावे लागले होते. त्यानंतर प्रशासनाने नागरीकांना विहीरीतील जलसाठा वापण्यासाठी पुन्हा खुली करण्यात आली आहे.
हिमायतनगर शहरातील नेहरूनगरमधील विहीरीला कुठल्याही प्रकारचे संरक्षण नाही. मोकळ्या जागेत असल्याने ती विहीर पुन्हा बुजवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तसेच विहीरीच्या आजुबाजुचा परीसर पुर्णपणे मोकळा आहे. परीसर मोकळा असल्याने मोकाट जनावरांसहीत शेतकऱ्यांची जनावरे चारा खाण्यासाठी तेथे येतात. जनावरे मोकळी असल्याने विहीरीच्या काठावर येतात. यामुळे जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने हिमायतनगर नगरपंचायतीचे कार्यकारी मुख्याधिकारी यांनी मुद्दा लक्षात घेऊन विहीरीला कुंपन करावे जेणेकरून गुरांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटेल, व पुढील अनर्थ होण्यापासून धोका टळेल असे मराठा साम्राज्य संघाचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष माधव शिंदे यांनी निवेदनाद्वारे विनंती केली आहे।

0 टिप्पण्या