पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ढाणकीत सामाजिक कार्यक्रम. रक्तदान शिबिर, कोव्हीड लसीकरण शिबिर संपन्न.

 


 प्रतिनिधी/ढाणकी

दि. १७ सप्टेंबर रोजी भारताचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमन्त्री तथा जागतिक नेते नरेंद्र मोदी यांचा ७१ वा जन्मदिवस ढाणकी भाजपा शहर तर्फे विविध लोकोपयोगी सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यामध्ये सद्यस्थितीतील कोव्हीड महामारीची गंभीर परिस्थिती पाहता कुठेही, कुणालाही रक्ताची कमतरता भासू नये या शुद्ध भावनेने, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. आणि कोव्हीड लसीकरणास गती यावी व लवकरात लवकर १००% लसीकरण देशात व्हावं आणि कोरोणा देशातून हद्दपार व्हावा या हेतूने, कोव्हीड लसीकरणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दोन्हीही लोकोपयोगी कार्यात ७१रक्तदात्यांनी रक्तदान केले तर ७१ जणांनी कोव्हीड लस घेतली. आणि गेली अनेक वर्षापासुन ढाणकीतील प्रसुती करणारी दायी जिजाबाई ईंगळे यांचा त्यांच्या सेवा कार्याप्रती आदर व्यक्त करुन साडीचोळी भेट देऊन सत्कार करण्यात आला हे विशेष.

 सदर कार्यक्रमास उमरखेड-महागाव विधानसभेचे विद्यमान आमदार नामदेव ससाने आणि भाजपा  जिल्हासचिव महेश काळेश्वरकर, भाजप तालुकाध्यक्ष सुदर्शन रावते यांनी हजेरी लावली. त्यांच्या हस्ते काही नवीन पक्षप्रवेश सुद्धा झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन ढाणकी चे नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांच्या हस्ते झालं. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शहराध्यक्ष रोहित वर्मा यांचे नेतृत्वात भाजप ढाणकीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं.

रक्तदान शिबीराकरीता गोळवलकर गुरुजी रक्तपेढी व लसीकरणास प्रा.आ.केंद्र ढाणकी यांची मदत मिळाली. याबद्दल रोहीत वर्मा यांनी आभार व्यक्त केले. यावेळी महेश पिंपरवार, प्रकाश जयस्वाल, पुंजाराम हराळे,श्रीकांत देशमुख, महेश शहाणे, प्रशांत पंडीतकर, गणलेश गांजरे, वैभव कोठारी, नागेश रातोळे, गोविंद मिटकरे, विक्रम येरावार, मंगेश चोरे, मारोती पडोळे यांसह भाजपाचे सर्व कार्यकर्ते हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या