खडकी-टेंभुर्णी- पावनमारी शिवारात हरीणाचा मृतदेह तोडलेल्या अवस्थेत आढळला, वन विभागातील अधिकारी आपले कर्तव्य पुर्ण करण्यास अपयशी.

 


दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी 

हिमायतनगर तालुक्यात वनपरीक्षेत्र भागात जंगलात वास्तव्य करणारे विविध प्रजातीचे प्राणी वास्तव्य करत आहेत यामध्ये प्रामुख्याने हरीण, वाघ, कोल्हा, सुसर इत्यादी असे अनेक प्राणी आढळून येतात.  जंगलात वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांवर देखभाल करणे, एखादा प्राणी मृत अवस्थेत आढळल्यास त्या प्राण्यांचा पंचनामा शवविश्चेदन करून त्याचा मृतदेहाची व्यवस्थितरीत्या विल्हेवाट लावणे ही जबाबदारी वन अधिकारी यांची असते. परंतु हे वन विभागातील अधिकारी पगार मिळवण्यासाठीच नोकरी करत असल्याचे सदैव आढळून येत आहे. कारण अशीच एक घटना खडकी-टेंभुर्णी- पावणमारी शिवारात हरीणाचा मृतदेह अर्धा तोडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

      हिमायतनगर तालुक्यात महीण्याला, पंधरा दिवसाला एक तरी जंगलात वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांचा मृतदेह शेत शिवारात आढळून येतो, काल संध्याकाळी दि. २९ आँगस्ट रोजी  नामदेव सखाराम सातलवाड यांच्या खडकी-टेंभुर्णी पावणमारी शिवारात असलेल्या कापसाच्या राणात हरीणाचा मतदेह हिंस्त्र प्राण्यांनी अर्धा तोडलेल्या अवस्थेत मिळाला आहे. नेमका या हरीणाचा मत्यु कशाने झाला अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु मतदेह बघीतल्यावर असे दिसुन येती की, या हरणाला वाघाने, कोल्ह्याने, कुत्र्याने किंवा इतर कोणत्यातरी हिंस्त्र प्राण्यानेच या हरणाचा बळी घेतल्याचे जाणवते. हरणाच्या मत्युमुळे खडकी-पावणमारी- टेंभुर्णी व आजुबाजुच्या परीसरात शेतकरी, नागरीक दहशतीखाली वावरत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची वन अधिकाऱ्यांनी संशोधन करून हरीणाच्या मत्युचे कारण स्पष्ट करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या