हिंगोली प्रतिनिधी
कोरोना ने संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी भारतभर लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे सर्व व्यवहार बंद पडून मजूर, गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना आपण आपले पोट कसे भरायचे हा मोठा प्रश्न पडला होता. अश्या या संकटाच्या वेळी गरिबांच्या मदतीला धान फाउंडेशन ही संस्था धावून आली असून संस्थेच्या हिंगोली शाखा तसेच चंद्रकांतअप्पा इराण्णाअप्पा सराफ सोन्या चांदीचे व्यापारीयांच्या पुढाकाराने 20 गरीब महिलांना किराणा, धान्य, मास्क चे वाटप करण्यात आले. तसेच बचतगटातील 500 महिलांसाठी सुद्धा मास्क चे वाटप करण्यात आले.
धान्य किट स्वीकारताना त्या महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. यावेळी अनिल दवणे, हनुमान जगताप, गंगासागर बालखंडे, संगीता जाधव, सीमा लोणकर, ललिता रानबावले, ज्योती कोरपडे, प्रियांका इंगळे, निकिता दिपके, सीमा मुदिराज व विलास अन्नछत्रे उपस्थित होते.


0 टिप्पण्या