ढाणकी प्रतिनिधी
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ढाणकी येथे ६ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी व सहायक पोलीस निरिक्षक भोस यांनी सदर रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
एक वेळच्या रक्तदानामुळे आपण गरजुंचे प्राण वाचवु शकतो या सामाजीक हेतूने बांधीलकी म्हणुन प्रत्येकाने रक्तदान करुन गरजु रुग्णांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करण्याची अवशक्ता आहे. त्यामुळे प्रत्येकाने या महाकुंडात सहभागी व्हावे असे आवाहन बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रताप भोस यांनी नागरिक, व्यापारी व गणेश मंडळाना केले होते.
त्यामुळे त्यांच्या हाकेला ओ देत मोठ्या उत्साहाने रक्तदान शिबिरात सहभाग घेतल्याने दिवस भरात 315 रक्त दात्यांनी रक्तदान केले. आज पर्यंतचा इतिहासात शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान झालेले नाही हे उल्लेखनीय.
रक्तदान शिबिरात १० पेक्षा जास्त व्यक्तींनी रक्तदान केल्यास त्या गणपती मंडळास स्मृतीचिन्ह तथा प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त सामाजीक संस्था, व्यापारी महासंघ, नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होवुन रक्तदान करणाऱ्याचा सत्कार करण्यात येणार असल्याचे पोलीस स्टेशन च्या वतीने सांगण्यात आले. रक्तदानाला नांदेड येथील शासकीय महाविद्यालयाची रक्तपेढी आली होती.
महारक्तदान शिबीर पार पडण्या करिता पोलीस स्टेशन बिटरगाव चे ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस, पोउपनि कपिल म्हस्के, पोना रवी गित्ते, मोहन चाटे, गजानन खरात, पोलीस शिपाई दत्ता कुसराम, निलेश भालेराव, सतीश चव्हाण, मोहसीन पठाण व सर्वे गणेश मंडळे, व्यापारी महासंघ ढाणकी, शासकीय कार्यालय, पोलीस पाटील, व पत्रकार बांधव यांनी अथक प्रयत्न घेऊन कार्यक्रम पार पडला.

0 टिप्पण्या